महाबीजने भाजीपाला बियाण्यातील वाटा वाढवावा : कृषिमंत्री दादा भुसे

कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाबीजचा आढावा घेतला
कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाबीजचा आढावा घेतला

अकोला   :  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महाबीज, कृषी विद्यापीठे व कृषी विभागाने संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. विद्यापीठाने जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संशोधनाची मदत घेऊन उत्तम प्रतीचे वाण तयार करण्यासाठी संशोधन करावे. महाबीजने आपला भाजीपाला बियाण्यातील वाटा वाढवावा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी केल्या. 

अकोला दौऱ्यावर असताना श्री. भुसे यांनी महाबीजच्या मुख्यालयास भेट देत आढावा घेतला. या वेळी आमदार नितीन देशमुख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. मानकर, महाव्यवस्थापक (उत्पादक) एस. एम. फुंडकर, महाव्यवस्थापक (गुणनियंत्रण व प्रशासन) डॉ. पी. एस. लहाने, महाव्यवस्थापक (वित्त) एम. आर. यादव, महाव्यवस्थापक (प्रक्रिया) पी. पी. पागृत, पी. एच. वर्मा उपस्थित होते.

कर्जत, बुलडाणा, वाशीम, खंडाळा (नगर), हिंगोली या पाच ठिकाणी गोदाम उभारणी प्रस्तावित आहे. शिवणी (अकोला) येथे सौर ऊर्जेवर चालणारे वातानुकूलित व आर्द्रतारहित गोदाम बांधून तयार असल्याची माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक  अनिल भंडारी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com