Farmer Agricultural News Many farmers are deprived of crop insurance Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पुणे  ः पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आॅनलाइन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळाल्याने तसेच कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणींमुळे पीक विम्यापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले.

पुणे  ः पंतप्रधान पीक विमा योजनेतील सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आॅनलाइन अर्ज भरताना सुविधा तत्पर न मिळाल्याने तसेच कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणींमुळे पीक विम्यापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले. शुक्रवारी (ता.३१) दुपारपर्यंत जिल्ह्यातील १६,२६९ शेतकरी या योजनेत सहभागी झाले. गेल्यावर्षी सुमारे १८ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पीक विम्याचा मोठा आधार शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल विमा योजनेत सहभागासाठी असतो. कृषी विभागही जागृती करून शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करतो. मात्र, यंदा ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क पुरेसे नसल्यामुळे पीकविमा अर्ज स्वीकारताना बँकांनाही अनेक अडचणी आले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या आहेत. 

पीक विमा भरण्यासाठी केंद्राने स्वतंत्र आॅनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु ग्रामीण भागात सर्व्हरच्या अडचणी असल्याने पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागले. काही ठिकाणी गावांची नावे नसल्याने त्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयांना यांची माहिती दिली गेली तरीही या अडचणी सुटल्या नाहीत.

शिरूर तालुक्यातील करर्डे येथील शेतकरी भाऊसाहेब पळसकर म्हणाले, की मी पीक विमा भरण्यासाठी चार ते पाच चकरा मारल्या. परंतु आॅनलाइन अर्ज भरताना गावाची ग्रामपंचायत वेगळी दाखवत होते. त्यासंबंधी कृषी सहायकांना माहिती दिली. त्यांनीही वरिष्ठांना कल्पना दिली. परंतु अखेरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती झाली नाही. अर्ज भरताना अनेक अडचणी आल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याकरिता शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी आमची मागणी आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...