Farmer Agricultural News market committee gives order to do fine if not follow instruction Pune Maharashtra | Agrowon

सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे शिरुर बाजारसमितीचे निर्देश

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने बाजार समित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिल आहेत. त्यानुसार गुरुवारपासून (ता.२६) शिरूर मुख्ययार्ड येथे शेतकरी बाजार (भाजीपाला बाजार) पूर्ववत भरविण्यात येत आहे. मात्र, नागरिक विनाकारण गर्दी करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन बाजार समितीच्या सूचनांचे पालन केले नाही तर पाच हजार रूपयापर्यंत दंड आकारला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने बाजार समित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिल आहेत. त्यानुसार गुरुवारपासून (ता.२६) शिरूर मुख्ययार्ड येथे शेतकरी बाजार (भाजीपाला बाजार) पूर्ववत भरविण्यात येत आहे. मात्र, नागरिक विनाकारण गर्दी करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन बाजार समितीच्या सूचनांचे पालन केले नाही तर पाच हजार रूपयापर्यंत दंड आकारला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 

लॉकडाऊनमुळे नागरिक किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ही गर्दी कमी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी बाजार समित्या चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सध्या अनेक ग्राहक बाजार समितीत भाजीपाला, फळे घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने पुढाकार घेत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिल्या आहेत.

सध्या शिरूर बाजार समितीअंतर्गत पिंपळे जगताप आणि तळेगाव ढमढेरे अशा दोन ठिकाणी उपबाजार भरविले जातात. शिरूर येथील मुख्य बाजारात १५ ते १६ व्यापारी असून येथे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये. येथे सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सुत्रांकडून करण्यात आले आहे.

व्यापारी, शेतकरी, ग्राहकांनी अशी काळजी घ्यावी

  • बाजार समितीत शेतमाल विक्री करताना सुरक्षित अंतर ठेवावे
  • तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा
  • हात वेळोवेळी सार्वजनिक स्वच्छता गृहामध्ये असणाऱ्या बेसिनवर हॅन्डवॉशने धुवावेत
  •  शासन व बाजार समितीने वेळोवेळी केलेल्या नियमांचे पालन करावे
  • एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये
  • यार्डावर विनाकारण प्रवेश करू नये.
  • सकाळी सहा वाजता गेट बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणासही मार्केटमध्ये प्रवेश मिळणार नाही
     

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...