Farmer Agricultural News market committee will start within two days Nagar Maharashtra | Agrowon

नगर बाजार समिती दोन दिवसांत सुरु होणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

नगर  ः बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नगर बाजार समिती दोन दिवसांत सुरु होणार आहे. गुरुवारी (ता.२६) सायंकाळी बाजार समिती व जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीच्या भाजीपाला लिलाव होत असलेल्या आवारात फक्त विक्रेते, खरेदीदार, हमाल, मापाडी यांनाच प्रवेश मिळणार आहे.

नगर  ः बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नगर बाजार समिती दोन दिवसांत सुरु होणार आहे. गुरुवारी (ता.२६) सायंकाळी बाजार समिती व जिल्हा प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीच्या भाजीपाला लिलाव होत असलेल्या आवारात फक्त विक्रेते, खरेदीदार, हमाल, मापाडी यांनाच प्रवेश मिळणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन झालेले असताना भाजी खरेदीच्या नावाखाली चार दिवसांपूर्वी लोकांनी बाजार समितीत गर्दी केली. त्यामुळे शासनाने बाजार समित्या चालू ठेवणार असल्याचे सांगितले असले तरी नगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला होता. मुळात सरकारच्या विरोधात जाऊन असा आदेश काढल्याचे बोलले जात असले तरी गर्दी टाळण्यासाठी असा निर्णय घ्याला लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशातील व्यवहार २१ दिवस बंद राहणार आहेत. बाजार समिती बंद असल्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना भाजी मिळेना झाली आहे. परिणामी शहरात भाजीटंचाई निर्माण झाली असून ग्रामीण भागात भाजीपाला शेतातच सडू लागला आहे.

त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार चालू करण्याबाबत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली. त्यानुसार भाजीबाजारात काम करणारे हमाल, मापाडी, व्यापारी आणि भाजी विक्रीसाठी आणणारे शेतकरी, शहरातील किरकोळ भाजी खरेदीदार यांना भाजीपाला बाजारात प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी बाजार समिती आणि महानगरपालिकेकडून ओळखपत्रे दिली जाणार आहेत. या व्यक्तींव्यतरिक्त कोणालाही प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे गर्दीवर नियंत्रणही मिळवता येणार आहे. आज (शनिवारी) किंवा उद्या (रविवारी) सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समिती सुरु होईल, असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...