शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करणार : मंत्री जयंत पाटील

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी यंदा केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, असे आश्वासन पणनमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
कापूस पणन महासंघाच्या अडचणींसंदर्भात शुक्रवारी (ता.२१) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कापूस पणन महासंघाच्या अडचणी संदर्भात शुक्रवारी (ता.२१) मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख, उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, की राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केला आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल. तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावा लागला तर अडचणी येणार नाहीत, त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com