बाजार समित्यांनी भाजीपाला, फळांचा पुरवठा सुरळीत ठेवावा : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

सद्यःस्थितीत सांगली बाजार समितीत हळदीचे सौदे बंद असून ते पुर्ववत करण्यासाठी धुळे बाजारसमितीने जी टोकन पद्धत राबवली आहे, त्या धर्तीवर त्वरित कामकाज सुरू करण्यात यावे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकांनी कृषी विभागाशी समन्वय ठेऊन कामकाज करावे. - बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री.
पणनमंत्री बाळासाहेब पाटील
पणनमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवत भाजीपाला, फळांचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, अशा सूचना सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. 

राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समित्यांच्या सचिवांची श्री. पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, की बाजार समित्यांमध्ये कामकाज चालू ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी. बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सॅनिटायझरचाही वापर करावा. सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांना शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com