मराठवाड्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करा ः जलसंपदामंत्री जयंत पाटील

सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील
सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील

औरंगाबाद  ः मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे या भागात पाणीटंचाई असते. मराठवाड्यातील पाण्याची गरज पाहता अपूर्ण सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात शनिवारी (ता. ७) आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. या वेळी मंडळाचे कार्यकारी संचालक ना. व. शिंदे, जलसंपदाचे मुख्य अभियंता ए. पी. आव्हाड, लाभक्षेत्र विकासचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक डी. डी. तवार, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या वेळी खोरेनिहाय राज्यातील सिंचन क्षमता, गोदावरी, कृष्णा, तापी, कोकण, नर्मदा नदी खोऱ्यांतील उपलब्ध पाणी आणि तूट, महामंडळांतर्गत निर्मित पाणीसाठा, सिंचन क्षमता, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, बळिराजा जलसंजीवनी योजना, नदीजोड प्रकल्प व प्रवाही वळण योजना, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्प, नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प, लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प, बीड जिल्ह्यातील ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प टप्पा २, पैठण येथील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे २) आदींसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांचा सविस्तर आढावा श्री. पाटील यांनी घेतला. सुरुवातीला मंत्री पाटील यांचे श्री.‍ शिंदे यांनी स्वागत केले. तसेच, महामंडळाच्या कामकाजाचे सविस्तर सादरीकरण केले. बैठकीनंतर श्री. तवार यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com