संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्रात

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यत: कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतिही प्रगती झाली नाही. बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांच्या पोर्ट ब्लेअरसह बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

उद्या (ता.२९) सकाळपर्यंत अंदमान बेटांच्या उर्वरित भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. मालदिव आणि कोमोरीन भागातून मॉन्सून दाखल होणार असून, पुढे केरळकडे वाटचाल होणार आहे.

यंदा मॉन्सून चार दिवस उशिरानेे ५ जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. उद्या (ता.२९) अरबी समुद्रात मॉन्सून दाखल होणार असल्याने पुढील वाटचालीबद्दल आशा उंचावल्या आहेत. 

  अरबी समुद्रात वादळाचे संकेत  बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात वादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. समुद्राच्या नैर्ऋत्य भागात वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता.२९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. रविवारपर्यंत त्याची तीव्रता वाढून वादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com