Farmer Agricultural News monsoon arrival status Pune maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्रात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 मे 2020

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांवर आणखी वाटचाल केली आहे. दक्षिण अंदमानात तब्बल दहा दिवस अडखळलेल्या मॉन्सूनने अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअरपर्यंतची मजल मारली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव आणि कोमोरीन भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावित झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यत: कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतिही प्रगती झाली नाही. बुधवारी (ता.२७) अंदमान बेटांच्या पोर्ट ब्लेअरसह बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

उद्या (ता.२९) सकाळपर्यंत अंदमान बेटांच्या उर्वरित भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. मालदिव आणि कोमोरीन भागातून मॉन्सून दाखल होणार असून, पुढे केरळकडे वाटचाल होणार आहे.

यंदा मॉन्सून चार दिवस उशिरानेे ५ जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. यात चार दिवसांची मागे पुढे तफावत होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. उद्या (ता.२९) अरबी समुद्रात मॉन्सून दाखल होणार असल्याने पुढील वाटचालीबद्दल आशा उंचावल्या आहेत. 

 
अरबी समुद्रात वादळाचे संकेत 
बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात वादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. समुद्राच्या नैर्ऋत्य भागात वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता.२९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. रविवारपर्यंत त्याची तीव्रता वाढून वादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...