Farmer Agricultural News Monsoon forecast declared Pune Maharashtra | Agrowon

देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता : हवामान विभाग

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला.

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला. या अंदाजात चार टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मध्य भारतात १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. देशात जुलै महिन्यात १०३ टक्के तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून पावसाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी जाहिर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देशात १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४१ टक्के), तर दुष्काळाची शक्यता ५ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम’(एसईएफएस) मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रिंसिपल काम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) मॉडेलचा आधार घेण्यात आला आहे. ‘आयएमडी’च्या मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (एमएमसीएफएस) यंदा सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०७ टक्के पाऊस पडणार असून, यातही चार टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.

हंगाम अखेरीस सौम्य ला-निना स्थिती
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात थंड एल-निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात सौम्य ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. प्रशांत महासागरात ला-निना स्थिती असल्यास देशात चांगला पाऊस पडतो असे समजले जाते. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही हीच स्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता
पावसाचे प्रमाण शक्‍यता
९० टक्‍क्‍यांहून कमी ५ टक्के
९० ते ९६ टक्के १५ टक्के
९६ ते १०४ टक्के ४१ टक्के
१०४ ते ११० टक्के २५ टक्के
११० टक्‍क्‍यांहून अधिक १४ टक्के

 

हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज
वायव्य भारत १०७ टक्के
मध्य भारत १०३ टक्के
दक्षिण भारत १०२ टक्के
ईशान्य भारत ९६ टक्के

 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...