Farmer Agricultural News Monsoon status Pune Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची आणखी प्रगती शक्य

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल दरमजल करत देशाकडे वाटचाल करत आहेत. आज (ता.३१) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.१) मॉन्सून देवभुमी केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल दरमजल करत देशाकडे वाटचाल करत आहेत. आज (ता.३१) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.१) मॉन्सून देवभुमी केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर दहा दिवस मॉन्सून अडखळला होता. मात्र बुधवारी (ता.२७) मॉन्सूनचे प्रवाह बळकट होत उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली. गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. मात्र त्यानंतर पुन्हा दोन दिवस बंगालच्या उपसागरात वाटचाल रेंगाळली असून, वाऱ्यांनी पुढे चाल केलेली नाही.

दरम्यान, अरबी समुद्रावरूनही मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली असून, मालदिव आणि कोमोरीनसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात सोमवारपर्यंत (ता.१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ओमान किनाऱ्यालगत वादळाचे संकेत
अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे आज (ता.३१) ओमान किनाऱ्यालगत कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारी (ता.३०) ही प्रणाली ओमानच्या सलालाहपासून ३० किलोमीटर उत्तरेकडे तर येमेनच्या घायदाहपासून उत्तरेकडे २४० किलोमीटर अंतरावर होती. आज वायव्येकडे सरकून जमिनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मालदीव आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात उद्यापर्यंत (ता.१) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...