मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेत

पुणे : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने उद्या (ता.२) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. हे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातकडे येणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता.३१) प्रगती केली नाही. आज (ता. १) अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
संग्रहित छायाचित्र

मॉन्सून वाऱ्यांनी गुरूवारी (ता.२८) अंदमान, निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापला, तर अरबी समुद्रातून वाटचाल सुरू करत मालदिव, कोमोरीन भाग आणि दक्षिण श्रीलंकेत धडक दिली. शुक्रवारी (ता. २९) अरबी समुद्रात थोडीशी चाल केल्यानंतर दोन दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. आज (ता.१) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मॉन्सून पुढे सरकण्याची तसेच देवभुमी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागात लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. उत्तरेकडे सरकत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज (ता.१) तीव्र होणार आहे. उद्या (ता.२) महाराष्ट्र, कर्नाटक किनाऱ्यालगत चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. किनारपट्टीलगत ढगांची दाटी असल्याने पावसाला सुरुवात झाली आहे.

आज (ता.१) दक्षिण कोकण आणि गोव्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे आल्यानंतर बुधवारी (ता.३) आणि गुरूवारी (ता. ४) उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता.२) महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  ओमानजवळील कमी दाब क्षेत्र निवळतेय अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्र उद्यापासून (ता.१) निवळण्याची शक्यता आहे.रविवारी (ता.३१) ही प्रणाली ओमानच्या सलालाहपासून २० किलोमीटर उत्तरेकडे तर येमेनच्या अल-घायदाहपासून उत्तरेकडे २०० किलोमीटर उत्तरेकडे होती. ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकून जाण्याची शक्यता असून, ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यावर ताशी ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com