पशु चिकित्सालयांच्या कामकाज वेळेत बदलाच्या हालचाली

नागपूर : पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशु चिकित्सालयांच्या कामकाज वेळेत बदल करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यभरातून या विषयावर अभिप्राय मागविले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशु चिकित्सालयांच्या कामकाज वेळेत बदल करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यभरातून या विषयावर अभिप्राय मागविले आहेत. त्याआधारे वेळेत बदलाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यभरात पशुपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. संघटनेच्या मतानुसार, पशुपालकपूर्वी सकाळी जनावरांना चरायला घेऊन जात होते. त्यादरम्यान ते आपल्या जनावरांना गरज भासल्यास पशु चिकित्सालयात उपचारांसाठी देखील आणत होते. मात्र काळानुरूप पशुपालन पद्धतीत बदल अनुभवला जात आहे. आता सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशूपालक गाव, शहरात किंवा संकलन केंद्रांवर दूध घालायला जातात.

सकाळी दूध घालून परतल्यावर तसेच संध्याकाळी दुध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो. या दरम्यान ते आपल्या जनावरांना उपचारासाठी पशु चिकित्सालयात आणू शकतात. त्यामुळे पशु चिकित्सालयांच्या वेळेत बदल करण्याची मागणी आहे. या संदर्भाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुसंवर्धन सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. संघटनेच्या या मागणीची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याप्रश्‍नी अभिप्राय मागितले आहेत. गाव स्तरावरून पशुपालकांची मागणीदेखील विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतरच या संदर्भाने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.   पशु चिकित्सालयांची स्थिती

  • एकूण राज्य - ४८४७
  • जिल्हास्तर - ३३
  • जिल्हा परिषदकडे - ४१७७
  • राज्य सरकारकडे - ६७०
  • अशा आहेत वेळा फेब्रुवारी ते सप्टेंबर :

  • सकाळी सात ते बारा
  • दुपारी चार ते संध्याकाळी सहा
  • शनिवारी सकाळी सात ते दुपारी बारा.
  •   ऑक्‍टोबर ते जानेवारी

  • सकाळी आठ ते एक
  • दुपारी तीन ते पाच
  • शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एक
  • असा आहे प्रस्तावित बदल

  • सकाळी नऊ ते दुपारी ४.
  • शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १
  • प्रतिक्रिया राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुपालकांचा आग्रह असल्याचे सांगत पशु चिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश पशु चिकित्सालये जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या पार्श्वभूमीवर अभिप्राय मागविण्यात आले आहेत. पशुपालकांची मागणी देखील विचारात घेतली जाईल. त्यानंतर वेळेत बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. - सचिंद्र प्रताप सिंह, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे.   पशु पालनाच्या पद्धतीत बदल झाल्याने पशु चिकित्सालयांच्या वेळेत बदलाची मागणी आहे. त्याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. - डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com