Farmer Agricultural News Mung crop become in trouble due to rain Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे मुगाचे पीक पिवळे पडू लागले असून काही प्रमाणात रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मूग उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे मुगाचे पीक पिवळे पडू लागले असून काही प्रमाणात रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मूग उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात ६० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात यंदा लवकर पाऊस पडला असल्याने मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.आत्तापर्यंत सुमारे ६० हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर  मुगाची पेरणी झाली आहे. नगर तालुक्यात १९ हजार ५७३, पारनेर तालुक्यात २२ हजार १७७ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. कर्जत तालुक्यातही बऱ्यापैकी मुगाचे क्षेत्र आहे. हे पीकही जोमात होते.

सुमारे दोन ते अडीच फुटांपेक्षा अधिक पिकाची उंची वाढली आहे. मात्र गेली आठ दिवसांत वारंवार झालेला पाऊस, ढगाळ हवामान आणि  ऊन न पडल्याने मुगाचे पीक पिवळे पडले आहे. तसेच त्यास निघालेल्या शेगांही अतिशय लहान आकाराच्या आहेत. याशिवाय त्या वाकड्या झाल्या आहेत. आधीच वेगवेगळ्या कारणाने शेतकरी संकटात असताना आता जोमात आलेले मुगाचे पीकही संकटात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 
सध्या मुग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, रोगाची लक्षणे तपासून शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार फवारणी करावी, असे पारनेरचे तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...