विधानसभेच्या उपाध्यक्षपदी ऱाष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ  

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

मुंबई  : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या गळ्यात विधानसभा उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी (शनिवारी) उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

२००४ मधील विधानसभा निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. मात्र, २००९ मधील निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. मात्र २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी १२ हजार ६३३ मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी ६० हजार ८१३ च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह सलग दोन वेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com