धानाची नवीन जात यंदाच्या हंगामात होणार उपलब्ध

धानाची नवी जात
धानाची नवी जात

भंडारा  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत कार्यरत असलेल्या साकोली येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये कमी कालावधीच्या धान (भात) जातीचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी पूर्वप्रसारित केलेली ही जात शेतकऱ्यांच्या शेतावर स्वीकृती चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुंवर यांनी दिली.

साकोली येथील संशोधन केंद्रामध्ये धानाच्या विविध जातींवर संशोधन केले जाते. या संशोधन केंद्राने आतापर्यंत साकोली ६,७,८, पीकेव्ही गणेश, किसान व साकोली-९ या जाती उपलब्ध करून दिल्या आहेत. कमी पाण्यात, कमी कालावधीत येणाऱ्या जाड दाण्याची नवीन धानाची जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. 

ही आहे धानाच्या जातीची वैशिष्ट्ये

  • सध्या ११५ ते १२० दिवसांत परिपक्‍व होणाऱ्या जातीवर संशोधन सुरू आहे. दाणा लांब व बारीक आहे. 
  • १०००  दाण्याचे वजन २४ ते २५ ग्रॅम आहे.
  • जात अतिशय ठेंगणी असून लोळत नाही.
  • प्रतिहेक्टरी ४० ते ४५ क्‍विंटल सरासरी उत्पादन असून, अखिल भारतीय स्तरावरील प्रयोगात प्रतिहेक्टरी सरासरी ५८ क्‍विंटल उत्पादन नोंदविण्यात आले आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com