पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा प्रयोग

पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर पद्धती पाठोपाठ मावळ तालुक्यातील पुसाने आणि चांदखेड येथील दोन शेतकऱ्यांनी अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड केली आहे.
चांदखेडमधील विकास ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तीन एकरांवर अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड केली आहे.
चांदखेडमधील विकास ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तीन एकरांवर अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड केली आहे.

पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर पद्धती पाठोपाठ मावळ तालुक्यातील पुसाने आणि चांदखेड येथील दोन शेतकऱ्यांनी अभिनव पट्टा पद्धतीने  भात लागवड केली आहे. ही पद्धत यशस्वी झाल्यास पुढील वर्षी या पद्धतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  

वाढत्या मजूर टंचाईमुळे खरिपात भात लागवड वेळेवर होत नाही. त्यामुळे उत्पादनात घट होत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५४ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत २० हजार ७४३ हेक्टर म्हणजेच ३५ टक्के क्षेत्रावर भाताच्या पुर्नलागवडी झाल्या आहेत. मावळ तालुका हा भात शेतीचे आगार ओळखला जातो. येथील अनेक शेतकरी पारंपरिक, चारसुत्री, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करीत आहेत. चालूवर्षी या भागातील शेतकऱ्यांनी ड्रम सीडरच्या पद्धतीने भात लागवड करण्याचा प्रयोग केला आहे. त्यापाठोपाठ आता अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड करण्यावर भर दिला आहे.

मावळ तालुक्यात कृषी विभागातील कृषी सहाय्यक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदखेडमधील विकास ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तीन एकर, तर पुसाने गावातील दत्तात्रय बबन वाजे यांनी एक एकरावर अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड केली आहे. ही पद्धत कृषी सहाय्यक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी पारंपरिक भात लागवडीमध्ये बदल करून विकसित केली आहे.  

शेतकऱ्यांना पारंपारिक भात लागवडीमध्ये चुड्यात योग्य अंतर नसल्याने युरिया- डीएपी बिक्रेट देत येत नाही. तसेच रोपांची दाटी झाल्याने हवा खेळती राहत नसल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. भात रोपांचे पोषण जास्त होत नाही. परिणामी उत्पादन घटते. या गोष्टींचा विचार करून श्री. बोऱ्हाडे यांनी चांदखेड व पुसाने येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग म्हणून अभिनव पट्टा पद्धतीने भात लागवड यंदा केली आहे. यामध्ये दोन मीटरचा पट्टा करून ४० सेंटिमीटर जागा सोडली आहे. या दोन मीटरमध्ये ८ ओळीत भात रोपांची लागवड केली आहे. या नियंत्रित रोप लागवडीमुळे हवा खेळती राहणार आहे. तसेच युरिया -डीएपी ब्रिकेट देणेही सोपे जाणार आहे, अशी माहिती श्री. बोऱ्हाडे यांनी दिली.   पट्टा पद्धतीने होणारे फायदे 

  • नियंत्रित पद्धतीने रोप लागवड.
  • युरिया - डीएपी ब्रिकेटचा वापर शक्य
  • रोग-किडींचे प्रमाण कमी राहणार
  • खते देण्यासाठी व कीटकनाशके फवारणीसाठी सुलभपणा येणार
  • यंत्राव्दारे भात कापणी शक्य
  • पिकाच्या जोमदार वाढीमुळे उत्पादनवाढीची शक्यता.
  • प्रतिक्रिया पारंपारिक भात लागवडीमध्ये सुधारणा करीत ही पद्धत आम्ही विकसित केली आहे. यंदा पहिल्यांदाच दोन शेतकऱ्यांच्या शेतावर या पद्धतीने प्रायोगिक लागवड केली आहे. या प्रयोगाचे भात उत्पादन पाहून पुढील वर्षी ही पद्धत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर राबवण्याचा विचार आहे. - नवीनचंद्र  बोऱ्हाडे, कृषी सहाय्यक, कृषी विभाग, मावळ, जि. पुणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com