नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस  

 अवकाळी पावसामुळे आडवे झालेले गहू पीक
अवकाळी पावसामुळे आडवे झालेले गहू पीक

नगर  ः नगर शहरासह नगर, पाथर्डी, राहुरी, कर्जत तालुक्यांतील काही भागांत रविवारी (ता. १) दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी रात्री कर्जत तालुक्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारीला फटका बसला आहे. 

जिल्ह्यात यंदा सातत्याने बदलत्या हवामानाचा शेतीला फटका बसला आहे. हवामान बदलत असल्याने ज्वारीच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे. आताही दोन दिवसांपासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. शनिवारी रात्री कर्जत तालुक्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रविवारी दुपारी नगर शहरासह तालुक्यातील काही भागांत पाऊस झाला. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार, करंजी भागात गारांसह पाऊस झाला. पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. फार जोरदार पाऊस नसला तरी या पावसाने काढणीला आलेल्या गहू, ज्वारीसह अन्य पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com