पूर्व विदर्भात पुरामुळे एक लाख नागरिक बाधित

नागपूर : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील १७ तालुक्यांना पुराचा फटका बसला. प्राथमिक अंदाजानुसार, ९२ हजार ४२८ नागरिक पुरामुळे बाधित झाले. यापैकी ५३ हजार १२२४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील १७ तालुक्यांना पुराचा फटका बसला. प्राथमिक अंदाजानुसार, ९२ हजार ४२८ नागरिक पुरामुळे बाधित झाले. यापैकी ५३ हजार १२२४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूर ओसरल्यानंतर आता महामारीच्या शक्यतेने प्रशासनाकडून गाव सॅनिटाईझ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्प तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग आता कमी प्रमाणात होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून सुरुवातीला २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. आता केवळ पाच हजार क्युसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या पाचही जिल्ह्यात पूर बऱ्यापैकी ओसरला आहे. परंतु अनेक घरांमध्ये गावांमध्ये पाणी शिरल्याने त्या भागात आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नागरी आरोग्य जपण्याच्या दृष्टीने गावच्या गाव सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेतला आहे. गावांची स्वच्छता केल्यानंतर नागरिकांना परत येण्याची मुभा दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पाण्यामुळे जनावरांना होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी देखील लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. शेकडो हेक्टरवर वाळूचा थर पुरामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतशिवारात शेकडो हेक्‍टर पिकाची नासाडी झाली आहे. अनेक शिवारात वाळू पसरल्याने पुढील काही वर्षे ही जमीन लागवडीखाली आणणे कठीण जाणार असल्याची भीती वर्तविली जात आहे.   विभागातील स्थिती

  •  पाच जिल्ह्यांत १७ तालुके प्रभावित.
  •  ९२ हजार ४२८ पूर बाधित
  •  ५३ हजार २२४ स्थलांतरित.
  •  पाच जिल्ह्यांत १६२ पुनर्वसन केंद्रे.
  •  ११ हजार ७७६ पूरबाधित तात्पुरत्या निवारा केंद्रांत.
  • जिल्हानिहाय पूरबाधित

  • नागपूर - २८१०४
  • गडचिरोली - ३४०७
  • चंद्रपूर - ५९१७
  • भंडारा - ५५०००
  • गोंदिया - ०
  • पूरग्रस्त भागात नागरिकांची वाचविण्याचा प्राधान्य देण्यात आले. आता पूर ओसरल्यानंतर रस्ते, पीक आणि घराच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. याचा एकत्रित अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील. त्यापूर्वी गावात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. घरे सॅनिटाईज करुन दिली जात आहेत. - संजीव कुमार, विभागीय आयुक्त, नागपूर.   विभागातील पाच जिल्ह्यांत पीकहानी, घर पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे या माध्यमातून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर केला जाईल. विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून निधीची कमतरता पडणार नाही. - विजय वडेट्टीवार,मदत व पुनर्वसन मंत्री.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com