पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा उत्पादकांना फटका

नगर ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या पावसाने नगर जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसामुळे खरिपातील ८ हजार ६४९ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या पावसाने नगर जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसामुळे खरिपातील ८ हजार ६४९ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याशिवाय सुमारे १ हजार ११ हेक्टरवरील कांदा रोपांची नासाडी झाल्याचा अंदाज आहे.  जिल्ह्यात खरिपात साधारण २५ हजार हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड झाली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे.

सतत पाऊस सुरू राहिल्याने पिकातील पाणी बाहेर गेले नाही. त्यामुळे कांदा पीक जागेवर सडले. कृषी विभाग व प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ८ हजार ६४९ हेक्टरवरील कांदा पिकाची तर १ हजार ११ हेक्टरवरील रोपांची नासाडी झाली आहे. १३ हजार १४४ शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे तर ४ हजार २९५ शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. चार दिवसानंतर नेमके नुकसान स्पष्ट होणार आहे. 

दुष्काळात तेरावा महिना  नगर जिल्ह्यात यंदा कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण केला गेला आहे. वितरक दुप्पट दराने बियाण्याची सर्रास विक्री करीत आहेत. मागणी करुनही बियाणे मिळेनासे झाले आहे. त्यात पावसाने उपलब्ध रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रोपांचे हे नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.   बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात शेतकरी संख्या) 

  • नगर ः २०९९ (४६७) 
  • पाथर्डी ः १३६९ (२१४२)
  • पारनेर ः ४५८ (९६०)
  • कर्जत ः ५१६ (८८२)
  • श्रीगोंदे ः ४१३९ (९९७३) 
  • श्रीरामपूर ः ३५ (१५०)
  • नेवासे ः १३ (३६)
  • शेवगाव ः ३२३ (७६१)
  • राहुरी ः ३४३ (९९५)
  • कोपरगाव ः २६६ (१०५४) 
  • राहाता ः १३८ (२८९) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com