Farmer Agricultural News Onions are now transported by ST bus satara Maharashtra | Agrowon

लोणंद येथील कांद्याची आता एसटी बसने वाहतूक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

लोणंद, जि. सातारा  : एसटी महामंडळाने आता मालवाहतुकीस प्रारंभ केला आहे. लोणंद बाजार समितीतील कांदाही आता एसटी बसने राज्यासह देशभर पोचणार आहे. या बाजार समितीतील कांद्याचे व्यापारी राजू आग्रवाल यांनी कांदा कऱ्हाडला पाठवून एसटीतून कांदा वाहतुकीस प्रारंभ केला. 

लोणंद, जि. सातारा  : एसटी महामंडळाने आता मालवाहतुकीस प्रारंभ केला आहे. लोणंद बाजार समितीतील कांदाही आता एसटी बसने राज्यासह देशभर पोचणार आहे. या बाजार समितीतील कांद्याचे व्यापारी राजू आग्रवाल यांनी कांदा कऱ्हाडला पाठवून एसटीतून कांदा वाहतुकीस प्रारंभ केला. 

यावेळी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ, सहायक सचिव अमोल शेळके, कांदा व्यापारी राजू आग्रवाल, गोकुळदास शहा, रामदास सोळसकर, कऱ्हाड येथील कांद्याचे व्यापारी संतोष बागल, अमोल कांबळे उपस्थित होते. 

लोणंद येथे दर सोमवारी व गुरुवारी भरणाऱ्या कांदा बाजारात लोणंद बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बैलगाडी, ट्रक, टेम्पो आदी वाहनांतून कांदा विक्रीसाठी आणतात, तर खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांकडून ट्रक, टेम्पो व  रेल्वेनेही देशांतर्गत बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र, एसटी बसमधून आता कांद्याच्या गोण्या अन्य बाजारपेठेपर्यंत पोचणार आहेत.

दरम्यान, एसटी बसने  राज्यातील कोणत्याही बाजारपेठेत मालवाहतूक करण्यास सोपे होणार आहे. वाहतुकीसाठीच्या होणाऱ्या खर्चात २५ टक्के बचत होऊन सुरक्षित मालवाहतूक होणार असल्याने व्यापाऱ्यांना एसटी बसने वाहतूक निश्‍चितच परवडणारी आहे. त्यामुळे पुढील काळात व्यापारी वर्गातून एसटीने माल वाहतूक करण्यास  पसंती मिळेल, असा विश्वास या वेळी राजू अग्रवाल यांनी व्यक्त केला.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...