Farmer Agricultural News onions damage in fire Nashik Maharashtra | Agrowon

जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या कांद्याचे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण तालुक्यातील जयपूर (मेंढीपाडा) येथे उसाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग पसरून शेजारच्या कांदा चाळीनेही पेट घेतला. या आगीत साठवलेल्या शेकडो क्विंटल कांद्यासह शेतीउपयोगी व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.

नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण तालुक्यातील जयपूर (मेंढीपाडा) येथे उसाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग पसरून शेजारच्या कांदा चाळीनेही पेट घेतला. या आगीत साठवलेल्या शेकडो क्विंटल कांद्यासह शेतीउपयोगी व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी (ता.१) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जयखेडा परिसरात पावसाची सुरुवात झाली. यावेळी जयपूर येथे गट क्र.१६२ येथे शेतकरी रणजित सूर्यवंशी यांच्या उसाच्या पाचटाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, यामुळे शेजारी असलेल्या कांदा चाळीनेही पेट घेतला. त्यामुळे आगीच्या तांडवात चाळीत असलेला ३०० क्विंटल कांदा यात जळून खाक झाला. एकीकडे नैसर्गिक आपत्ती अन् आता ‘कोरोना’चे संकट असताना ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीपयोगी व काही संसारपयोगी साहित्यही जळाले आहे. त्यामुळे मोठी अडचण या शेतकऱ्यासमोर उभी राहिली आहे.

वीज पडून आग लागल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांना समजताच त्यांनी धाव घेत आग विझवून ती रात्री उशिरापर्यंत नियंत्रणात आली. सूर्यवंशी यांच्या चाळीला लागून इतर शेतकऱ्यांच्या चाळी होत्या. जर ही आग वाढली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, असे स्थानिकांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...