जैवऊर्जा निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नगर : जैव इंधनासह बांबूसारख्या पिकांपासून अगरबत्ती स्टिक, लोणचे, कपडे, पेपर मिलकरिता लागणारा पल्प यांसारखे पदार्थ तयार करता येतील. अशा छोट्या उद्योगांतून रोजगाराची साधने निर्माण होतील. जैवऊर्जा निर्मितीतून ग्रामीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नगर : जैव इंधनासह बांबूसारख्या पिकांपासून अगरबत्ती स्टिक, लोणचे, कपडे, पेपर मिलकरिता लागणारा पल्प यांसारखे पदार्थ तयार करता येतील. अशा छोट्या उद्योगांतून रोजगाराची साधने निर्माण होतील. जैवऊर्जा निर्मितीतून ग्रामीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ‘जैवऊर्जा- हवामान अद्ययावत नूतनीकरणक्षम ऊर्जा : सद्यःस्थिती आणि पुढील दिशा’ या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारमध्ये मंत्री गडकरी बोलत होते. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. अशोक ढवण (परभणी), अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. चिंतामणी देवकर, नियंत्रक विजय कोते या वेळी उपस्थित होते. 

मंत्री गडकरी म्हणाले, की पंजाब, हरियानात भाताचे, तसेच उत्तर प्रदेशातून साखरेच्या जास्तीच्या उत्पादनाचे रूपांतर जैव इंधनात करणे गरजेचे आहे. हवाई, तसेच सागरी वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनाची गरज जैव इंधनातून पूर्ण केली तर जीवसृष्टी, तसेच पर्यावरणाचे संवर्धन होईल. वातावरणातील प्रदूषण कमी होईल. बांबूचा उपयोग फर्निचर निर्मिती, पेपर इंडस्ट्रीमध्ये केला तर जंगलांचे संवर्धन होईल. पेपर पल्पच्या आयातीवरील आपला खर्च कमी होईल. यासाठी पीकपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. बांबूसारख्या पर्यावरणपूरक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे लागेल. ऑनलाइन वेबिनारसाठी देशभरातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com