Farmer Agricultural News orange producers become technosavy Nagpur Maharashtra | Agrowon

अमरावती, नागपुरातील संत्रा उत्पादक झाले टेक्‍नोसॅव्ही

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

अमरावती  ः लॉकडाउनमुळे संत्रा उत्पादक आणि तज्ज्ञांमध्ये संवाद होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेत रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञांमध्ये दुवा साधण्यात आला. शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादनासंदर्भातील आपले प्रश्‍न मांडले तर तज्ज्ञांनी त्यांचे निरसन केले.

अमरावती  ः लॉकडाउनमुळे संत्रा उत्पादक आणि तज्ज्ञांमध्ये संवाद होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेत रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञांमध्ये दुवा साधण्यात आला. शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादनासंदर्भातील आपले प्रश्‍न मांडले तर तज्ज्ञांनी त्यांचे निरसन केले.

अमरावती व नागपूर परिसरातील शेतकरी आंबिया बहारातील संत्रा फळांचे व्यवस्थापन शेतकरी करीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढती असल्याने फळगळीचा सामना त्यांना करावा लागतो. अशावेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सद्यःस्थितीत लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मार्गदर्शन विषयक कामांतही मर्यादा आल्या आहेत. रिलायन्स फाउंडेशन व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर पर्याय म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकरी, शास्त्रज्ञ संवाद घडवून आणला.

विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर, सहायक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र डॉ. योगेश इंगळे, अमरावतीचे कृषी सहसंचालक अनिल खर्चान यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. या कॉन्फरन्समध्ये ३५ गावातील ४४ शेतकरी सहभागी झाले होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे तसेच सहायक सुमित काळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...