Farmer Agricultural News order to give certificate of virus free fruit and vegetables Pune Maharshtra | Agrowon

शेतीमाल विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे व्यापाऱ्यांना आदेश

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

कोरोनाच्या विषाणूबाबत जी भीती आहे त्यापोटी आम्ही परिपत्रक काढले आहे. याबाबत आम्ही अन्न व औषध प्रशासनासोबत चर्चा करून संभ्रमवास्था दुर करू. 
- बाबा बिबवे, फळे भाजीपाला विभागप्रमुख. 

पुणे  ः कोरोना विषाणूबाबत देशात भीतीचे वातावरण असताना, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चीनमधून फळांची आवक होत नसताना देखील, परदेशी फळे विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे फळ व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून, वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र विषाणूमुक्त प्रमाणपत्रासाठी फळे, भाजापीला तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसल्याचे समोर येत आहे. 

कोरोना विषाणूबाबत देशभरात जनजागृती केली जात आहे. बाजार समित्यांमध्ये परदेशातून आवक होणारी फळे विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय फळे विक्री करू नये, असे आदेश बाजार समिती प्रशासनाने फळ विक्रेत्यांना दिले आहेत. मात्र ही फळांची तपासणी कुठे करायची, प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचे याबाबतचे मार्गदर्शन न करता केवळ आदेश देण्यात आले. एकतर चीनमधून कोणत्याही फळांची आवक होत नाही. तशी नोंदही बाजार समितीकडे नाही. तरीही विषाणुमुक्त प्रमाणपत्राची अट कशासाठी असा प्रश्‍न व्यापाऱ्यांनी केला आहे.  

कोणत्याही देशातून फळे, भाजीपाल्याची आयात करताना निर्यातदार आणि आयातदार देश त्याची तपासणी करुनच आयात - निर्यात करतात. या फळांच्या तपासणी यंत्रणा केंद्रीय पातळीवर असतात. स्थानिक पातळीवर फळांच्या चाचण्या करण्याचे अधिकार नसल्याचे पणन मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...