Farmer Agricultural News order to start government procurement centers Yavatmal Maharashtra | Agrowon

शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करा : पालकमंत्री संजय राठोड 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

 यवतमाळ  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता हमीभाव केंद्रे सुुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

 यवतमाळ  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता हमीभाव केंद्रे सुुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. राठोड बोलत होते. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह सीसीआय, पणन महासंघाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. राठोड म्हणाले, की जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची आवश्‍यकता असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन हमीभावानुसार शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात यावी. कापसासोबतच तूर, हरभरा खरेदीचा देखील मुद्दा ऐरणीवर आहे. विदर्भ मार्केटींग फेडरेशन तसेच जिल्हा पणन अधिकाऱ्यांमार्फत तूर, हरभरा खरेदी केंद्रांची प्रक्रिया राबविण्यात यावी.

जिल्हयात १६ खरेदी केंद्रे असून दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगाव या तालुक्‍यांत निधी व गोदामाअभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. परंतु पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी सुरु करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदी केंद्रांवर वीस गाड्यांना परवानगी असेल. खरेदी प्रक्रिया राबवितेवेळी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्कची सुविधा ठेवणे गरजेचे आहे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
 
कापसाची सर्वाधिक खरेदी
जिल्ह्यात पणन महासंघाची ९ केंद्रे आहेत. आतापर्यंत या केंद्रांवर ६ लाख ७० हजार ७२२ क्‍विंटल, सीसीआयच्या दहा केंद्रांवर १६ लाख ७५ हजार ४२ क्‍विंटल तर व्यापाऱ्यांकडून १० लाख ८३ हजार ७३९ क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४४ लाख ८४ हजार १७६ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...