Farmer Agricultural News over Fifteen thousand workers in trouble Nagar Maharashtra | Agrowon

पुणे, नगरमधील आदिवासी भागातील पंधरा हजारांवर मजूर संकटात 

सुर्यकांत नेटके
रविवार, 19 एप्रिल 2020

पावसाळ्यात जगता यावे, यासाठी आदिवासी भागातून मजूर उन्हाळ्यात बागायती पट्ट्यात मजुरीला जातात. याकाळात मिळविलेल्या तुटपुंज्या धान्य व मजुरीवर पावसाळ्याचे चार महिने जगतात. ‘कोरोना’मुळे गंभीर प्रश्न या कष्टकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आदिवासी भागात यामुळे भूक व कुपोषणाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे सर्व आदिवासींना तातडीने जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला पाहिजे. गावोगाव रोजगार हमीची कामे तातडीने सुरू केली पाहिजेत. 
- अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र . 

नगर ः उन्हाळ्यातील शेतीकामांसाठी वर्षानुवर्षे स्थलांतरित होऊन रोजगार मिळवणाऱ्या अकोले (जि. नगर) व अकोले तालुक्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुमारे पंधरा हजारांवर मजुरांच्या रोजगारावर ‘कोरोना’मुळे संकट ओढवले आहे. दुर्गम आदिवासी भागातील या शेतकरी मजुरांना ‘बंद’मुळे सुविधा मिळणेही अवघड झाल्याचे चित्र आहे. 

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील सुमारे पस्तीस गावांतील तसेच पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रत्येक गावांतून साधारण तीनशे ते साडेतीनशे शेतकरी मजूर दरवर्षी उन्हाळ्यात शेतीकामांसाठी संगमनेर, राहाता, पुणे जिल्ह्यामधील नारायणगाव तसेच नाशिक जिल्ह्यामधील काही गावांत साधारण तीन महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये हे मजूर गाव सोडतात व पावसाळा सुरु होण्याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात गावी परतात. हे सगळे मजुर स्वतः शेतकरी आहेत. मात्र गावांत रोजगार मिळत नसल्याने व उन्हाळ्यात शेतीकामे नसल्याने वर्षानुवर्ष ते स्थलांतरित होत असल्याचा अनुभव आहे. यंदा गाव सोडण्याच्या तयारीत असतानाच ‘कोरोना’मुळे अचानक देश, राज्यात लॉकडाउन झाले आणि रोजगारासाठी स्थलांतरित मजूर गावांमध्येच अडकून पडले.

आदिवासी भागातील या मजुरांचा खरीप हंगाम रोजगारांतून मिळणाऱ्या पैशांवरच अवलंबून आहे. यंदा मजुरीसाठी जाता आले नसल्याने रोजगारावरच संकट ओढवले आहे. या भागातील अनेक तरुण मुंबई, ठाणे, नाशिक भागात रोजगारासाठी विविध कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांच्यासह अन्य भागात गेलेले लोकही गावी परतले आहे. त्यामुळे कमावते व न कमवतेही घरीच असल्याने आर्थिक स्थिती बिघडली असून जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी या लोकांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आदिवासी भागात आहे. शिवाय ‘बंद’मुळे या भागात सुविधा मिळणेही अवघड झाले. शासनाकडून मिळणारे मोफत धान्य, तांदुळही अनेक ककुटुंबांना मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. 
 
शेतीतले प्रयोग गेले तोट्यात 
पावसाळ्यात अती पाऊस व नोव्हेंबरनंतर पाणीटंचाई अशी आदिवासी भागातील दरवर्षीची स्थिती. त्यामुळे शेती कायम अडचणीत, मात्र यातूनही अलीकडच्या काही वर्षांपासून आदिवासी भागातील शेतकरी शेतीत भाताशिवाय भाजीपाला, फळांसह अन्य पिकांचे वेगवेगळे प्रयोग करतात. यंदा मात्र असे केलेले प्रयोग ‘बंद’मुळे भाजीपाला, फळे विकता न आल्याने वाया गेले आहेत. दुर्गम भागात मी यंदा काकडी लागवड केली मात्र, ती विकता न आल्याने वाया गेल्याने खर्च निघाला नाही असे आदिवासी शेतकरी गंगाराम धिंदळे यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...