दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र चक्रिवादळाने बाधित

रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांतील ५८५० हेक्टर बागायती क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये दापोलीत २४२९.४२, तर मंडणगड तालुक्यात ३३१६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून भरपाईचे वाटपही सुरू आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांतील ५८५० हेक्टर बागायती क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये दापोलीत २४२९.४२, तर मंडणगड तालुक्यात ३३१६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून भरपाईचे वाटपही सुरू आहे.

दापोली कृषी विभाग आणि मंडणगड कृषी विभागाने नुकसानग्रस्त बागायतींचे पंचनामे पूर्ण केले असून या बागायतींच्या नुकसान भरपाईसाठी दापोली तालुक्यातून १२ कोटी १४ लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १० कोटी ९७ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली. मंडणगड तालुक्यातून या नुकसानभरपाईसाठी १५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

दापोली तालुक्यात ९८२३ नुकसानग्रस्त बागायतदार असून त्या पैकी ५९६ या वैयक्तिक नुकसानग्रस्त खातेदारांच्या बागायतींच्या नुकसानीची १ कोटी २६ लाखांची पहिली यादी दापोली प्रशासनाकडे देण्यात आली आहे. त्यापैकी वेळवी सर्कलमधील गावे आणि अन्य गावे असे मिळून ५७ लाख ११ हजार रुपये रक्कम नुकसानग्रस्तांंच्या खात्यात जमा झाली असून, ५६ लाख ४९ हजार रुपये लवकरच खातेदारांच्या खात्यात जमा होतील, असे दापोली तालुका प्रशासनाने सांगितले. तालुक्यात ८० टक्के क्षेत्र हे सामायिक क्षेत्र असून त्याबाबत हमीपत्र घेऊन पुढील यादी पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंडणगड तालुक्यात ६७०० नुकसानग्रस्त बागायतदार असून त्यांचीदेखील यादी टप्प्याटप्प्याने प्रशासनाकडे देण्याचे काम सुरू आहे, असे मंडणगड तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके यांनी सांगितले. तालुक्यात बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये याची दक्षता घेऊन सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. तालुक्यात २ हजार ४२९.४२ हेक्टर क्षेत्र बाधित असून त्यापैकी २५१ हेक्टर क्षेत्रातील वैयक्तिक ५९६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तालुका प्रशासन यांच्याकडे दिली आहे. बागायतदारांना योग्य भरपाईची अपेक्षा दापोली तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना झाडनिहाय भरपाई द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दापोली दौऱ्यादरम्यान केली होती. सरकारदेखील शेतकऱ्यांना झाडनिहाय भरपाई देण्याबाबत विचाराधीन असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त बागायतदारांना योग्य भरपाई मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com