राज्यात कापूस विक्रीसाठी एक लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी

पणन महासंघाकडून ४३ केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सीसीआयचा एजंट म्हणून ही खरेदी होत असल्याने त्यांच्या निकषांनुसार केवळ एफएक्‍यू दर्जाचाच कापूस घेतला जात आहे. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर कापूस खरेदीचा तिढा सुटला असला तरी गती वाढविण्यासंदर्भाने स्थानिकस्तरावर निर्णय होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील नोंदणी केलेल्या एक लाखांवर शेतकऱ्यांचा कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी हे संपूर्ण वर्ष खर्ची जाईल, अशी भिती व्यक्‍त केली जात आहे.

सीसीआय आणि जिनींग व्यावसायिकांमध्ये करारातील नियम आणि अटींच्या मुद्यावरून मतभेद वाढले होते. एक क्‍विंटल कापसावर प्रक्रिया केल्यानंतर रुई आणि ठरावीक घट प्रत्येक महिन्यासाठी निश्चित केलेली आहे. यावेळी लॉकडाउनमुळे फेब्रुवारी महिन्यात वेचलेला कापूस शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात विक्रीसाठी आणला. त्यामुळे मे महिन्यात प्रक्रिया होत असली तरी त्याकरिता खरेदीचे नियम एप्रिल महिन्याचे लावण्यात यावे, असा जिनर्सचा आग्रह होता. याप्रकरणी तोडगा निघत नसल्याने खरेदी रखडली होती. अखेरीस याप्रकरणी सीसीआय आणि जिनींग व्यावसायिकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत मे महिन्यासाठी एप्रिलचे निकष लावण्याचे ठरत कापूस खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.   पणन महासंघाकडून ४३ केंद्रांवर खरेदी सुरु  राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने ७५ पैकी ४३ केंद्रांवर खरेदी सुरु केली आहे. सीसीआयचे केंद्र सुरु करण्याची गती काहीशी मंदावली आहे. दरम्यान कापूस विक्रीकरिता आजवर राज्यात सुमारे १ लाख १५ हजार १४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये विदर्भात ५९ हजार ३०५ तर मराठवाड्यातील ५५ हजार ८४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

झोननिहाय शेतकरी संख्या

नागपूर १४,०९८
वणी ३९३४
यवतमाळ १६,०८५
अकोला २५५८
अमरावती १७,३२७
खामगाव ५३०३
औरंगाबाद २७१८
परभणी १९,२३५
परळी वैजनाथ २२,५०३
नांदेड ३२०६
जळगाव ८१८०
एकूण १,१५,१४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com