Farmer Agricultural News paddy harvesting starts Sindhudurga Maharashtra | Agrowon

 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात कापणी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भात पीक क्षेत्र परिपक्व स्थितीत आहे. परंतु, पावसामुळे भात कापणी करता येत नव्हती.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भात पीक क्षेत्र परिपक्व स्थितीत आहे. परंतु, पावसामुळे भात कापणी करता येत नव्हती.

१५ ते २० दिवसांनी जिल्ह्यात पावसाने पुर्णतः विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर यावर्षी भात रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे तीन हजार हेक्टरवर हळवी व भिजवणीचे भात पीक आहे. हे पीक आता परिपक्व झाले आहे. कापणीच्या स्थितीत असलेल्या या पीकाची कापणी पावसामुळे करता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, आता पावसाने ‘ब्रेक’ घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. 

जिल्हयात सध्या कडक ऊन असून वातावरण असेच राहिले तर येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील ५० टक्के भात पीक परिपक्व होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांकडील भात पीक परिपक्व झाले आहे त्यापैकी काहींनी कापणीला सुरूवात केली आहे तर काहींनी पूर्वतयारी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...