Farmer Agricultural News pankaja munde did agitation for water issue aurangabad maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत अपेक्षांची पूर्ती व्हावी ः पंकजा मुंडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

मराठवाडा दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी हे लाक्षणिक उपोषण  केले आहे. भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना आत्ताच्या सरकारने पुढे नेल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे; तर सरकारकडून मराठवाड्यातील जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नाबाबत असलेल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून लाक्षणिक उपोषण केल्याचे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्‍नासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि भाजपच्या वतीने  माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लाक्षणिक उपोषणाची गरज व भूमिका स्पष्ट केली. उपोषणस्थळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, मेघना बोर्डीकर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, की महाविकास आघाडी सरकारने आमच्या सरकारच्या तुलनेत चांगले काम करून दाखवावे ही अपेक्षा आहे. मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेऊन आधीच्या सरकारप्रमाणे मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. या वेळी  एका लहान मुलीच्या हाताने लिंबू सरबत घेऊन पंकजा मुंडे यांनी उपोषण सोडले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत लेखी निवेदन दिले.

या आहेत प्रमुख मागण्या

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे.
  • विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत.
  • जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी.
  • मराठवाडा वॉटरग्रिड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत.
  • कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
  • जायकवाडी धरणात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून देऊन ते कालव्याद्वारे सिंदफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे.
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा.
  • औरंगाबाद शहराची १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी
  • बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा.

 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...