नांदेड जिल्ह्यात दोन हजारांवर हरभरा उत्पादकांचे चुकारे थकीत

नांदेड ः जिल्ह्यातील२ हजार १६ शेतकऱ्यांच्या ३३ हजार ४२३ क्विंटल हरभरा विक्रीपोटी १६ कोटी २९ लाख ३१ हजार १७३ रुपयांचे चुकारे अदा करणे बाकी आहे, असे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या सहा केंद्रांवर ७ हजार ४२० शेतकऱ्यांकडून १ लाख २८ हजार ३५६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. शुक्रवारपर्यंत (ता.१४) एकूण ५ हजार ४०४  शेतकऱ्यांना ९४ हजार ९३३ क्विंटल हरभरा विक्रीपोटी ६२ कोटी ५७ लाख ३८ हजार ९६१ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्याप २ हजार १६ शेतकऱ्यांच्या ३३ हजार ४२३ क्विंटल हरभरा विक्रीपोटी १६ कोटी २९ लाख ३१ हजार १७३ रुपयांचे चुकारे अदा करणे बाकी आहे, असे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, मुखेड येथील केंद्रावर हमीभावाने हरभरा विक्रीसाठी १६ हजार ४३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी आणण्याकरिता संदेश पाठविण्यात आले आहेत. परंतु, ७ हजार ४२० शेतकऱ्यांच्या १ लाख २८ हजार ३५६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

३१.५६ क्विंटल तुरीचे चुकारे बाकी नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, मुखेड या केंद्रांवर तूर विक्रीसाठी ८ हजार ९८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ४७१ शेतकऱ्यांची २० हजार १७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. आजवर ४ हजार ४६५ शेतकऱ्यांना २० हजार १४३ क्विंटल तुरीचे ११ कोटी ६८ लाख ३२ हजार ३०० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. आता केवळ ६ शेतकऱ्यांच्या ३१.५६ क्विंटल तुरीचे १ लाख ८३ हजार ४८ रुपयांचे चुकारे अदा करणे बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले.    

चुकारे बाकी स्थिती :  हरभरा (क्विंटल), चुकारे (कोटी, रुपये)
केंद्र हरभरा चुकारे रक्कम शेतकरी संख्या
नांदेड  २९०५ १.४१६१ १९०
हदगाव १३१७२  ६.४०१८  ७११
किनवट  ७३५६ ३.५८६० ५०५
बिलोली  ६१६१ ३.००३७ ३८३
देगलूर  ३४६० १.६८६७  २०१
मुखेड  ४०८ ०.१९९१ २६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com