Farmer Agricultural News Police cleared three hundred six disputes at the farms Latur Maharashtra | Page 2 ||| Agrowon

लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात मिटविले ३०६ तंटे

हरि तुगावकर
गुरुवार, 9 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात शेतीचा बांध, सामाईक शेती, शेतरस्ते, सामाईक नाले तसेच अन्य शेतीच्या कारणांवरून मारहाणीच्या गुन्ह्यांची प्रकरणे वाढू लागली. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पंधरा दिवसांची मोहीम राबवून पोलिस कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले. पाचशे गावांमध्ये जात प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत तेथेच ३०६ तंटे मिटवले गेले. 

लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अनेक लोक बाहेरगावाहून गावाकडे आले. या काळात शेतीचा बांध, सामाईक शेती, शेतरस्ते, सामाईक नाले तसेच अन्य शेतीच्या कारणांवरून मारहाणीच्या गुन्ह्यांची प्रकरणे वाढू लागली. ही बाब पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत पंधरा दिवसांची मोहीम राबवून पोलिस कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवले. पाचशे गावांमध्ये जात प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत तेथेच ३०६ तंटे मिटवले गेले. ‘कोरोना’च्या काळात राज्यातील पोलिसांकडून राबवला गेलेला हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. यातून तंटे मिटवण्यासोबतच मने जुळवण्यातही पोलिसांना यश आले आहे. 

५०७ गावांतील बांधांवर गेले पोलिस 
जिल्ह्यात पोलिस अधीक्षक डॉ. माने यांच्या आदेशानुसार जूनमध्ये पंधरा दिवस ग्रामभेटीच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. यात नऊ पोलिस निरीक्षक, १३ सहायक पोलिस निरीक्षक, १९ पोलिस उपनिरीक्षक तर ६९ पोलिस कर्मचारी असे एकूण ११० पोलिस अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील ५०७ गावांतील बांधांवर गेले. मार्चपासून लॉकडाउनमध्ये पोलिस रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यात ही मोहीम त्यांनी राबवली आहे.

जागेवरच मिटविले ३०६ तंटे
गावागावातील शेतरस्ते, शेतीचे बांध, शेतातील नाले, जमिनींचे वाद याची माहिती पोलिसांनी एकत्र केली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेत पंधरा दिवसांत ३०६ तंटे जागेवरच मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. यातून नागरिकांची आपापसातील भांडणे मिटवत मने जुळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

गुन्हे टळले अन् खर्चही वाचला
शेतीचा बांध, शेतरस्ता, नाला यातून शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. यातून मारामारीचे प्रकार घडून पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद केले जातात. वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात चालतात. यात दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा मोठा खर्च होतो. इतकेच नव्हे तर पिढ्यानपिढ्या याचे परिणाम दिसून येतात. पण पोलिसांच्या या उपक्रमामुळे भविष्यात दाखल होणारे गुन्हे तर टळलेच, पण संबंधित शेतकऱ्यांचा खर्चही वाचण्यास मदत झाली आहे.

आकडे बोलतात..
उपविभाग गावभेटी मिटविलेले तंटे 
लातूर शहर १३
लातूर ग्रामीण ७३ ४४
औसा १०६ ६६ 
निलंगा ११५ ५३ 
चाकूर ४१ ४१
अहमदपूर १४९ ८५
उदगीर ग्रामीण १० १४ 
एकूण ५०७ ३०६

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अनेकांनी गाव गाठले. यातून शेतीशी निगडित अनेक प्रश्न समोर आले. बांधावरून मारामारीच्या घटना वाढल्या गेल्या. भविष्यात या घटना वाढू नयेत म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. त्याला चांगले यश आले. ३०६ तंटे मिटवता आले आहेत. 
  — डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक, लातूर


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...