Farmer Agricultural News police close market committee Pune Maharashtra | Agrowon

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे खडकी उपबाजार बंद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शहरातील फळे, भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये पोलिस हस्तक्षेप करीत आहेत. विविध अडचणींचा मुकाबला करीत पुणे बाजार समिती प्रशासनाने मुख्य बाजार वगळता ४ उपबाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुक्रवारी (ता.१७) खडकी येथील उपबाजार आवार बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनाने दिल्याने बाजार बंद करण्यात आला आहे.

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शहरातील फळे, भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये पोलिस हस्तक्षेप करीत आहेत. विविध अडचणींचा मुकाबला करीत पुणे बाजार समिती प्रशासनाने मुख्य बाजार वगळता ४ उपबाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुक्रवारी (ता.१७) खडकी येथील उपबाजार आवार बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनाने दिल्याने बाजार बंद करण्यात आला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात पडून राहत असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील फळे, भाजीपाला टंचाईमुळे दर वाढले आहेत. यातून ग्राहकांची देखील लूट सुरु झाली आहे. त्यातच गुलटेकडी परिसर संवेदनशील भाग झाल्याने, उपबाजार सुरु करण्याचा निर्णय पोलीस, महसूल आणि बाजार समितीने घेतला. त्यानुसार गुरुवारी (ता.१६) मांजरी, मोशी, उत्तमनगर आणि खडकी उपबाजार सुरु करण्यात आले. गुरुवारी (ता.१६) सुमारे २५० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. मात्र शुक्रवारी (ता.१७) स्थानिक पोलीस प्रशासनाने खडकी येथील उपबाजार बंद करण्याचे आदेश दिल्याने हा बाजार बंद ठेवण्यात आला होता.

याबाबत बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, की गुरुवारी खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाला पत्र देऊन खडकी उपबाजार सुरु केला होता. मात्र शुक्रवारी स्थानिक पोलीस प्रशासनाने हा उपबाजार बंद करण्याचे आदेश दिल्याने तो बंद होता. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत, बाजार आवार सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...