दादा भुसे ः शेतकरी पुत्र ते राज्याचे कृषिमंत्री

कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक : शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले दादा भुसे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत पदविका पूर्ण केली. पुढे शिक्षणाच्या बळावर काही काळ नोकरीही केली. मात्र नोकरीत जास्त काळ न रमता ते मालेगावी परतले. जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. त्या वेळी मालेगाव तालुका हा कॉंग्रेस आणि समाजवादींचा बालेकिल्ला असताना प्रस्थापित नेत्यांविरोधात संघर्ष करत श्री. भुसे यांनी राजकारणात उडी घेतली. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेला शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी गत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रिपद मिळवीत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द ठळकपणे उभी केली आहे. 

दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांच्या मतदारसंघात प्रस्थापित हिरे घराण्याकडे तालुक्याचे सत्ताकेंद्र होते. अशा परिस्थितीत प्रस्तापितांविरुद्ध लढण्याचे धाडस करत श्री. भुसे यांनी शिवसेनेचा विचार तळागाळात पोहोचवला. मालेगाव शहरातही समाजवादी विचार व अल्पसंख्याकांचा पगडा राहिला आहे. अगदी तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करून प्रवाहाविरुद्ध जात लढवय्या वृत्तीने श्री. भुसे यांनी काम केले. सुरवातीची अनेक वर्षे फक्त संघर्ष अन्‌ पराभवच वाट्याला येत होता.

मात्र २००४ मध्ये माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव करीत श्री. भुसे यांनी विजयाची मोहोर उमटविली. २००४ ते २०१९ दरम्यान झालेल्या सलग चार विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार त्यांनी मारला आहे. याचीच फलश्रुती म्हणून युती सरकारमध्ये त्यांना सहकार व ग्रामविकास खात्यांचे राज्यमंत्रिपद दिले गेले. आता त्यांना बढती मिळून ते राज्याचे कृषिमंत्री झाले आहेत. पक्षनिष्ठेचे फळ व युतीच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना सलग दुसऱ्यांदा महत्त्वाची संधी मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com