Farmer Agricultural News Pre monsoon rain in Marathwada Vidarbha | Agrowon

मराठवाडा, विदर्भात ‘पुर्वमोसमी’चा दणका सुरूच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवसांपासून सातत्याने पुर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. उशिराने काढणीस आलेल्या रब्बी पिकांसह फळपिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने पिकांची दाणादाण उडविली. मंगळवारी (ता.३१) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, संत्रा पिकांचे नुकसान झाले.

पुणे : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवसांपासून सातत्याने पुर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. उशिराने काढणीस आलेल्या रब्बी पिकांसह फळपिकांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने पिकांची दाणादाण उडविली. मंगळवारी (ता.३१) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, लिंबू, भाजीपाला, संत्रा पिकांचे नुकसान झाले.

औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी १९, जालना जिल्ह्यातील १७, बीड जिल्ह्यातील १८ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये मंगळवारी (ता.३१) पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. जालना, बीड जिल्ह्यातही काही मंडळात जोरदार पाऊस पडला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्या. सध्या उशिरा पेरणी झालेल्या पिकांची काढणी, मळणी सुरू असून, या पिकांचे अधिक नुकसान होत आहे. जोरदार वारे वाहत असल्याने फळपिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये वादळी वारे, पावसामुळे शेतीपिके तसेच फळपिकांचे नुकसान झाले.

अकोला जिल्ह्यातील पातूर, बार्शीटाकळी, बुलडाणा जिल्‍ह्यात चिखली, खामगाव, मेहकर या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पुर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पातूर तालुक्यातील चान्नी परिसरात मंगळवारी दुपारी चार वाजेनंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तासभर सुरु राहिलेल्या या पावसामुळे लिंबू, सीताफळ, पेरू या फळबागांचे नुकसान झाले. पातूर तालुक्यातील सायवणी, सुकळी परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. तसेच विवरा,चरणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील कलिंगड, खरबूज, लिंबू , पपई, भाजीपाला पिके व तसेच कांदा पीक भुईसपाट झाले. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात भाजीपाला, लिंबू, संत्रा आदी पिकांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अशी आहे स्थिती

  •  भाजीपाला, फळपिकांचे होतेय मोठे नुकसान.
  • अकोल्यातील पातूर तालुक्यात गारपीट.
  • कलिंगड, पेरू, पपई, सिताफळ, खरबुजाला फटका.

 


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...