पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची चाहूल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) केरळमध्ये धडक दिली असताना राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) केरळमध्ये धडक दिली असताना राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सोमवारी (ता.१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळाला असून, खरीप हंगामासाठी पूर्वमशागतींच्या कामाला वेग येणार आहे. जोरदार वारे आणि गारांमुळे फळे, भाजीपाला, बाजरी, ऊस पिकांना फटका बसला आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार वारा व ढगाच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी पहाटेही जुन्नर, पुरंदर, दौंड, शिरूर, हवेली, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांसह पूर्वपट्ट्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे उन्हाळी बाजरी, ऊस पिकाचे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातील सातारा शहरासह कऱ्हाड, कोरेगाव तालुक्‍यांत वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. ऊस, हळद, भात पिकास हा पाऊस उपयुक्त ठरला ठरणार आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे नुकसान वाढले आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, शिराळा व मिरज तालुक्‍यात गारपीट झाली. जोरदार वारे गारांमुळे काही ठिकाणी द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळल्या. कर्जत, पारनेर, पाथर्डी भागात झालेल्या वादळी पावसाने फळे, भाजीपाल्याला फटका बसला. मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, परभणीसह सर्वदूर पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे फळझाडे मुळासकट उपटून पडल्याने नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com