Farmer Agricultural News preparation complete of turmeric plantation Sangli Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात हळद लागवडीचे नियोजन पूर्ण

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

सध्याचे हवामान हळद पिकाच्या उगवणीसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुनच हळद लागवड करावी.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबेडिग्रज.

सांगली  ः यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीपूर्व मशागती करुन ठेवल्या आहेत. यंदा हळद लागवडीचा हंगाम रविवारपासून (ता. २६) सुरु होत आहे. शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार करुन पेरणीचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या हंगामात हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्‍यता हळद संशोधन केंद्राने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्‍यांत हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीपूर्व मशागती करुन ठेवल्या आहेत. रविवारी (ता. २६) हळद लागवडीचा मुहूर्त केला जाणार असून त्यानंतर लागवड केली जाईल.

गेल्यावर्षी जिल्ह्यात सुमारे १ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर हळद पीक होते. ऑगस्ट महिन्यात महापूरामुळे हळदीचे मोठे नुकसान झाले होते. परिमाणी यंदा हळदीचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक शेतकरी एकत्र येवून नवीन हळदीचे बियाणे कोईमतूरवरुन मागवले आहे.
 
हळद संशोधन केंद्रातील बियाणे झाले खराब
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महापूर आला. त्यानंतर अतिवृष्टी झाली. या साऱ्याचा फटका हळद संशोधन केंद्रातील बियाण्याला बसला आहे. सर्वसाधारणपणे संशोधन केंद्रातील ५० ते ६० टक्के बियाणे पाण्यामुळे खराब झाले आहे. उर्वरित बियाण्याची विक्री झाली असल्याचे हळद संशोधन केंद्राच्या सुत्रांनी सांगितले.
 
बाजार समितीत बियाणांची विक्री थांबली
कोरोना विषाणूमुळे सांगली बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. बाजार समितीत दरवर्षी व्यापाऱ्यांकडून हळद बियाणांची विक्री होती. परंतू बाजार समिती बंद असल्याने बाजार समितीच्या आवारात हळदीचे बियाणे आलेच नसल्याने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाही.

गेल्यावर्षी महापूराने हळद पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा बियाणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ग्रुप करुन आम्ही कोईमतूर येथून १० टन हळदीचे बियाणे घेऊन येणार आहोत, असे डिग्रज येथील हळद उत्पादक शेतकरी  प्रमोद पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...