Farmer Agricultural News At present district is corona free washim Maharashtra | Agrowon

वाशीम जिल्हा सध्यातरी कोरोनामुक्त

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब आहे. मात्र, भविष्यात ‘कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शासनाच्या सूचनेनुसार ३ मेपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असून सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
-हृषिकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशीम.

वाशीम  : वाशीम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याची बाब ३ एप्रिलला समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखला. आता २१ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल निगेटिव्ह आला असून जिल्हा सध्यातरी कोरोनामुक्त झाला आहे.

जिल्ह्याबाहेर जावून आलेल्या एका व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. कोरोना बाधित झालेल्या या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील (हायरिस्क) १२ व्यक्तींना तातडीने आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सुदैवाने त्यापैकी कोणालाही कोरोना विषाणू संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करीत त्याठिकाणी कन्टेन्टमेंट प्लॅन लागू करण्यात आला. १ हजार ६० कुटुंबातील ५ हजार ३२० लोकांचा सर्व्हे करून त्यांची माहिती संकलित करण्यात आली. कन्टेन्टमेंट प्लॅन लागू केल्यापासून पुढील १४ दिवस नियमितपणे हे चमू सर्व १ हजार ६० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देवून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत होते.

२१ दिवसांची अथक मेहनत, कोरोना हद्दपार
कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी, जिल्ह्यात आढळलेल्या एकमेव कोरोना बाधित व्यक्तीला बरे करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य पथक गेली २१ दिवस अथक प्रयत्न करीत होते. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार केल्यानंतर १४ व्या व १५ व्या दिवशी त्या व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खचून न जाता या पथकाने पुन्हा पाच दिवस सदर रुग्णावर उपचार करून २० व्या व २१ व्या दिवशी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुन्हा तपासणीला पाठवले. यावेळी मात्र दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आणि ‘कोरोना’ला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कामगिरी फत्ते झाली.

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...