farmer agricultural news price increase of onion plants pune maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. मात्र लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपांची खरेदी करून लागवड करत आहेत.
- दत्तात्रय जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.

पुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात कांदा लागवडीच्या कामाला वेग आला आहे. मात्र अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे वाहून गेली तर काही ठिकाणी सडल्याने कांदा लागवडीसाठी रोपांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कांदा रोपांचे बाजार गगनाला भिडले असून, प्रति जुडीच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी मिळेल त्या किमतीत रोपांची खरेदी करून कांदा लागवड करत आहे. त्यातच मजुरांची टंचाई व लोडशेडिंगचे प्रश्‍नही शेतकऱ्यांना भेडसावत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात खरीप कांद्याचे सरासरी तीन हजार ३७० हेक्टर, लेट खरीप कांद्याचे ११ हजार ८३९ हेक्टर, तर रब्बी (उन्हाळी) कांद्याचे १८ हजार ९२६ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास नऊ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली असल्याचे चित्र आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पावसामुळे कांदा लागवड उशिराने सुरू झाली आहे. कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे.

जिल्ह्यात आगाप कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. मात्र अतिपावसामुळे लेट खरीप व रब्बी कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्यामुळे बाजारभाव टिकून राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. सध्या ग्रामीण भागात तीन दिवस आठ तास वीजपुरवठा दिवसा केला जातो. उर्वरित दिवस वीजपुरवठा रात्री केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवड करायला वेळ लागत आहे. त्यातच मजुरांची कमतरता व विजेचा लपंडाव यामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला असून, दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.

एका जुडीला २५ ते ३० रुपये दर
आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व हवामानातील बदलामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रोपांचा तुटवडा भासत आहे. शेतकरी मिळेल त्या ठिकाणी कांदा रोपांची खरेदी करत असून जुडीला २५ ते ३० रुपये मोजावे लागत आहे. कधी नव्हे एवढा भाव कांदा रोपांना मिळू लागल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीऐवजी कांदा रोपे विक्रीवर भर देऊ लागली आहेत.
 
मी दरवर्षी कांदा लागवड करतो. यंदाही आंतरपिकात चार एकरावर लागवड करणार आहे. त्यासाठी दहा किलो बियाणे टाकले आहे. रोपांची अवस्था चांगली असून, पुढील आठवड्यात कांद्याची लागवड करणार आहे. परंतु एकूणच परिसरात कांदा रोपांचे दर वाढले आहेत. त्यामुळे बियाणे विकत घेऊन रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पारगाव सालोमालो (ता. दौंड) येथील शेतकरी  ईश्‍वर अनिल वाघ यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...