नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध संकलन बंद

माझ्याकडे शंभरपेक्षा अधिक गायी असून दर दिवसाला साडेसातशे लिटर दुध उत्पादन होते. आम्ही थेट खाजगी संघाला दुध देतो. मात्र शुक्रवारपासून दुध उचलणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. - रखमाजी जाधव, दुध उत्पादक शेतकरी, जि.नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुधाला मागणी नसल्याने आणि संघांमध्ये काम करण्यासाठी मजूर येत नसल्याचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील काही खाजगी दुध संघांनी शुक्रवारपासून (ता.२७) दुध संकलन बंद केले आहे. संकलन सुरु आहे तेथे प्रतिलिटर सहा ते आठ रुपये दर कमी केल्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.  

दुध वाहतूक करणारी वाहने दुध उचलत नसल्याचे कारण पुढे करुन अनेक खाजगी संघांनी शुक्रवारपासून दुध संकलन बंद केले आहे. विशेष म्हणजे दुध हे जीवनावश्यक वस्तुंमध्ये समाविष्ट असल्याने दुधाचा पुरवठा सुरुच राहणार असल्याचे वारंवार सांगितले जात असतानाही खाजगी दुध संघांनी संकलन बंद केले आहे. त्याचा आता थेट आर्थिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहेत.

लाॅकडाऊनमुळे आधीच शहरात जाण्याचे रस्ते बंद झाले असताना आता दुध संकलन केंद्रेच बंद झाली असल्याने या दुधाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे दुध संकलक विजय लांडगे यांनी सांगितले.  दुधाला मागणी नसल्याने काही खाजगी संघांनी दुध संकलन बंद केले आहे. मात्र दुध संकलन बंद करणे हा त्यावर पर्याय नाही. राज्यात दर दिवसाला प्रत्येकी दिड कोटी लिटर दुधाची पावडर करता येईल असे प्लॅन्ट आहेत. त्यामुळे पावडर तयार करुन शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येऊ शकते, असे कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com