Farmer Agricultural News Production of softgel capsule from pomegranate seed oil solapur maharashtra | Agrowon

डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल कॅप्सूल’ची निर्मिती

सुदर्शन सुतार
शनिवार, 14 डिसेंबर 2019

डाळिंब बियाच्या तेलापासून कॅप्सूल आणि पावडरनिर्मितीचा असा पहिलाच प्रयोग आहे. डाळिंबाचे अधिकाधिक मूल्यवर्धन आणि उपयुक्तता सिद्ध करण्याबरोबर शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. 
- डॉ. ज्योत्सना शर्मा, केंद्र संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने दोन वर्षांपूर्वी डाळिंबाचे ‘सोलापूर लाल’ आणि ‘सोलापूर अनारदाना’ ही दोन वाणे संशोधित करून महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याची पद्धती या आधीच विकसित केली आहे. पण, आता त्यापुढे जाऊन आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणाऱ्या या तेलापासून स्प्रे डाइंग तंत्रज्ञानचा वापर करून स्प्रे डाइंड पावडर आणि सॉफ्टजेल कॅप्सूलची निर्मिती केंद्राने केली आहे. या तेलातील औषधी गुणधर्म अधिककाळ टिकावे आणि त्याचे नेमकेपणाने सेवन करता यावे, हा या तंत्रज्ञानामागचा उद्देश आहे. 

डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र हे आघाडीवरील राज्य आहे. देशातील एकूण लागवडीच्या ८० टक्के म्हणजे सुमारे सव्वा लाख एकरहूनही अधिक क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. डाळिंबापासून ज्यूस, अनारदाना यांसारखे प्रक्रियायुक्त उपपदार्थ सध्या उपलब्ध आहेत. पण, ज्यूसनिर्मितीनंतर वेस्ट म्हणून उरणाऱ्या डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याचे संशोधन या आधीच केंद्राने तयार केले आहे. 

५० मि.ली.च्या पॅकिंगमध्ये या बॉटल उपल्ब्ध आहेत, पण या तेलामध्ये असणारा ‘कॉन्जुगेटेड लिनोलेनिक ॲसिड’ हा घटक सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास या तेलातील जैविकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या घटकाचे मोठ्या प्रमाणात ऑक्सिडोशन होते, हे नुकसान टाळण्यासाठी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी या तेलापासून जिलेटिनयुक्त सॉफ्टजेल कॅप्सुल आणि स्प्रे डाईंग तंत्रज्ञानाद्वारे स्प्रे डाइंड पावडर तयार करण्यावर संशोधन केले आणि त्यानुसार हे संशोधन पूर्ण झाले. यामुळे डाळिंब तेलाच्या साठवण क्षमतेत वाढ तर झालीच, पण या तेलातील जैवसक्रिय घटकांना अधिक काळ  टिकवून ठेवणेही सोपे झाले. 

आयुष मंत्रालयाचे अर्थसाह्य
संशोधन केंद्राला हे इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवी दिल्लीतील राष्ट्रीय औषधी मंडळ, आयुष मंत्रालय यांनी संशोधन प्रकल्पातंर्गत अर्थसाह्य दिले आहे. 

सामंजस्य कराराद्वारे मिळणार तंत्रज्ञान 
संशोधन केंद्राने डाळिंबाच्या बियापासून तेल काढण्याचे तंत्रज्ञान या आधीच विकसित केले आहे. तसेच त्याच्या पेटंटसाठीही (स्वामित्व हक्क) प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवला आहे. सध्या हे तंत्रज्ञान खासगी किंवा वैयक्तिक उद्योग सामंजस्य कराराने हे तंत्रज्ञान मिळवू शकतात.

कॅप्सुल आणि पावडरचे हे आहेत आरोग्यवर्धक गुणधर्म

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
  • ह्रदय विकारात लाभदायक
  • कॅन्सरसारख्या आजारावरही प्रभावी लाभदायक
  • त्वचेसाठी लाभदायक हार्मोनलचे संतुलन करते 
  • केस गळती थांबवते
  • टिकवण क्षमता सहा महिन्यांपर्यंत

 


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...