अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा लागवडीची शक्यता

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागाने यावर्षी १ लाख २३ हजार ६२० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले असून, यात ८७ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले असल्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांची लवकरच लागवड सुरू होणार आहे. कृषी विभागाने यावर्षी १ लाख २३ हजार ६२० हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले असून, यात ८७ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. 

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख १५ हजार ४६६ हेक्टर आहे. यंदा सरासरी लागवड क्षेत्रात वाढ होऊन ते १ लाख २३ हजार ६२० हेक्टरपर्यंत राहू शकते. सततच्या पावसाने खरिपातील पिकांचे नुकसानही झाले आहे. ही मरगळ झटकून शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लवकरच सुरुवात करणार आहे. या आठवड्यात सोयाबीन काढणीला सार्वत्रिक स्वरूपात सुरुवात होत असून १५ दिवसात हा हंगाम बऱ्यापैकी पूर्ण होऊ शकतो. त्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या जमिनीतील ओलीचा फायदा घेत शेतकरी हरभरा लागवडीकडे वळणार आहेत.

कृषी खात्याच्या नियोजनानुसार जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड अपेक्षित आहे. गव्हाची २८ हजार हेक्टरवर लागवड होईल. १०० हेक्टरवर करडईचेही नियोजन केले आहे. सोबतच ५०० हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे. रब्बीसाठी सुमारे ६५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी महाबीजकडे ३५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.     रब्बी पीकनिहाय नियोजित क्षेत्र (हेक्टर)

  • रब्बी ज्वारी :२०००
  • हरभरा : ८७,०००
  • गहू :२८,०००
  • कांदा व इतर पिके : ६०००
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com