farmer agricultural news rabbi sowing status pune maharashtra | Agrowon

पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत ढगाळ हवामान होते. याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. पुणे विभागात रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू आहेत. विभागात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत सात लाख ४४ हजार ५६५ हेक्टरवर म्हणजेच ४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत ढगाळ हवामान होते. याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. पुणे विभागात रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू आहेत. विभागात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत सात लाख ४४ हजार ५६५ हेक्टरवर म्हणजेच ४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची काढणी लांबली होती. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे वाफसा नसल्याने रब्बी पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले होते. त्यामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होते. परिणामी काही भागांत हरभरा, गव्हाच्या पेरण्या ठप्प होत्या. गेल्या दोन दिवसांपासून हवामान कोरडे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीस सुरुवात केली आहे.

विभागात रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही ठिकाणी या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कीड नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सुचविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक पोटरी अवस्थेत आहे. अनेक भागांत हरभरा पेरणी प्रगतीपथावर आहे. तसेच खरीप हंगामातील तूर पीक फुलोऱ्यात असून पावसामुळे तूर पीक पिवळे पडून फुलोरा गळत आहे. सूर्यफूल पिकाची काढणी चालू आहे.    
 

जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टर)
जिल्हा  सरासरी क्षेत्र   झालेली पेरणी
नगर ६,६७,२६१ २,९०,८६५
पुणे ३,९१,८९७ १,३०,७६४
सोलापूर ७,२१,८७७  ३,२२,९३६

 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...