नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख हेक्टरवर पेरा
पुणे ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत ढगाळ हवामान होते. याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. पुणे विभागात रब्बी पेरण्या धीम्या गतीने सुरू आहेत. विभागात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत सात लाख ४४ हजार ५६५ हेक्टरवर म्हणजेच ४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची काढणी लांबली होती. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे वाफसा नसल्याने रब्बी पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले होते. त्यामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होते. परिणामी काही भागांत हरभरा, गव्हाच्या पेरण्या ठप्प होत्या. गेल्या दोन दिवसांपासून हवामान कोरडे झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पेरणीस सुरुवात केली आहे.
विभागात रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही ठिकाणी या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कीड नियंत्रणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना सुचविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक पोटरी अवस्थेत आहे. अनेक भागांत हरभरा पेरणी प्रगतीपथावर आहे. तसेच खरीप हंगामातील तूर पीक फुलोऱ्यात असून पावसामुळे तूर पीक पिवळे पडून फुलोरा गळत आहे. सूर्यफूल पिकाची काढणी चालू आहे.
जिल्हा | सरासरी क्षेत्र | झालेली पेरणी |
नगर | ६,६७,२६१ | २,९०,८६५ |
पुणे | ३,९१,८९७ | १,३०,७६४ |
सोलापूर | ७,२१,८७७ | ३,२२,९३६ |
- 1 of 1498
- ››