Farmer Agricultural News Rajesh Topes mother admitted in hospital he working for civilians Mumbai Maharashtra | Agrowon

आई ‘आयसीयू’मध्ये, तरी आरोग्यमंत्री झटताहेत जनतेसाठी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे गेल्या वीस दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती आहेत. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील जनतेसाठी झटताना पहायला मिळत आहेत.  

मुंबई  ः ‘कोरोना’चा शिरकाव आता महाराष्ट्रात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र या सगळ्यात एक व्यक्ती सतत राज्याच्या जनतेला माहिती देण्याचं आणि ‘कोरोना’ला राज्यात येण्यापासून रोखण्याचं काम करत आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे गेल्या वीस दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती आहेत. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील जनतेसाठी झटताना पहायला मिळत आहेत.  

राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे महाराष्ट्रात कोरोना पसरू नये यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. श्री. टोपे यांनी नुकतीच विमानतळावर जाऊन प्रवाशांच्या क्रिनिंग व्यवस्थेची पाहणी केली. श्री. टोपे वेळोवेळी माध्यमांशी संपर्क साधत आहेत. रुग्णालयांत जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेत आहेत. कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांची पाहणी करत आहेत. तसंच ते राज्याच्या जनतेला योग्य मार्गदर्शन करीत आहेत. मात्र या सगळ्यात स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठीही श्री. टोपे यांच्याकडे वेळ नाहीये. स्वतःची आई रुग्णालयात असूनही त्यांना आपल्या आईच्या प्रकृतीची विचारणा करायला पुरेसा वेळ मिळू शकत नाहीये.   

बॉम्बे हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्रींवर उपचार सुरू आहेत. मात्र राज्यभरात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे श्री. टोपे यांना त्यांच्या मातोश्रींना पुरेसा वेळ देता येत नाहीये. 

याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने राजेश टोपे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना श्री. टोपे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले. ‘‘शरद पवार यांनी किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी केलेले काम माझ्यासाठी आदर्श आहे’’, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. 

डॉक्‍टर आणि परिचारिकांचे मानले आभार
आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे यांच्‍यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. टोपे यांनी रुग्‍णालयातील रुग्णांची सद्यःस्थिती जाणून घेतली. त्‍यांना आवश्‍यक त्‍या सोयीसुविधा देण्‍याबाबत सूचना केल्‍या. रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिका उत्तम सेवा देत असल्‍याबद्दल श्री. टोपे यांनी त्‍यांना धन्‍यवाद दिले.


इतर ताज्या घडामोडी
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...