Farmer Agricultural News raju shetty demand to give electricity for twelve hours Kolhapur Maharashtra | Agrowon

शेतीला दिवसा बारा तास वीज द्या : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाउन करण्यात आले आहे. औद्योगिक वीज वापरही बंद असल्याने शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा. सध्या शेतकरी लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. 

कोल्हापूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाउन करण्यात आले आहे. औद्योगिक वीज वापरही बंद असल्याने शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा. सध्या शेतकरी लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. 

गेल्या सोळा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्व उद्योगधंदे, व्यापार, कॉर्पोरेट कार्यालये, औद्योगिक वसाहती पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या शेतीला तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री असा वीज पुरवठा केला जात आहे. कडक उन्हाळा सुरु असल्याने पिकांना वेळेवर पाणी देण्याची गरज आहे. शेती पिकली तरच देशातील १३७ कोटी जनतेला अन्नधान्य मिळणार आहे. मात्र पिकांना रात्री पाणी देणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होत आहे. त्यामुळे सध्या विजेची बचत होत असून किमान याकाळात तरी शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा.

जेणेकरून लॉकडाउनच्या काळात देशातील जनतेला चांगल्या प्रतीचे अन्नधान्य, भाजीपाला मिळेल. महापुराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेती आणि घरांचे पंचनामा करण्यात आले असले तरी अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. असे असताना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, द्राक्ष, फळे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करून दिलासा द्यावा. लॉकडाऊनच्या काळात बचत झालेली वीज शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी श्री. शेट्टी यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...