Farmer Agricultural News revenue minister says online saat baara issue solve soon Sangli Maharashtra | Agrowon

...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२ घेऊन जाण्याची गरज नाही : महसूल मंत्री थोरात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

राज्यातील महसूल विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत, त्यामुळे कामाचा निपटारा होत नाही. ही रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेऊन भरतीप्रक्रिया सुरू केली जाईल.
— बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा आणि खाते उताऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा उतारा घेऊन जाण्याची गरज नाही. ज्या कार्यालयात शेतकऱ्यांचे काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सांगली येथे शुक्रवारी (ता. १४) पत्रकारांशी बोलताना मंत्री थोरात यांनी ही माहिती दिली. या वेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, की महापूर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना मदत व नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मात्र ती मिळण्यात काही अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सूचना दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे प्रयत्नशील आहेत. मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी डॉ. कदम गाववार आढावा, तसेच मंगळवारी (ता. १८) सांगली येथे बैठक घेतील. सांगली हा स्वतंत्र तालुका व्हावा अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. सांगली तालुका निर्मितीसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ असे मंत्री थोरात यांनी या वेळी सांगितले.

 


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...