ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या क्लेशदायक : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नगर ः पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मल्हारी बटुळे (वय ३१) या शेतकऱ्याने कर्जामुळे आत्महत्या करणे वेदनादायी आहे, अशी खंत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. सुलभ पद्धतीने कर्जमाफी केल्यानंतरही असे प्रकार घडत असतील, तर आमचे नेमके कुठे चुकते, याचा विचार करणार आहोत, असेही ते म्हणाले.

शुक्रवारी संगमनेर येथे मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की शेतकऱ्यांना ताकद देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार निश्चित करीत आहे. दोन लाखांपर्यंत व त्यापुढील रकमेसाठी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा देणार आहोत. मागील सरकारच्या काळात दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी कुटुंबासह रात्रंदिवस लागणाऱ्या रांगा, किचकट अटी व फॉर्म, तसेच मागील बाकी रक्कम भरण्याची अट असे निकष होते. मात्र, आमच्या सरकारने ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. या कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्याने सुरवात होणार आहे. शेतकऱ्यांनी मनोधैर्य न गमावता आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून भक्कमपणे उभे राहावे. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.
‘मुस्लिम समाजाला आरक्षण देणार’
आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी नंतरच्या देवेंद्र फडणवीस सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार ओबीसी व मराठा आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना न्यायालयात टिकेल असे आरक्षण देणार आहे. धर्म म्हणून नाही, तर आर्थिकदृष्ट्या म्हणून आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे.
- 1 of 1026
- ››