राज्यातील रब्बी क्षेत्र यंदा ८ लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज ः कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई : सध्या होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांच्या क्षेत्रात सुमारे आठ लाख हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज असून एकूण क्षेत्र ६० लाख हेक्टरपर्यंत पोहोचेल. ही बाब विचारात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
कृषिमंत्री दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई : सध्या होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांच्या क्षेत्रात सुमारे आठ लाख हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज असून एकूण क्षेत्र ६० लाख हेक्टरपर्यंत पोहोचेल. ही बाब विचारात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

खरीप हंगामाच्या धर्तीवर यंदा प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक  शनिवारी (ता.५) कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली. पुणे येथे झालेल्या या बैठकीमध्ये कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, व्यवस्थापकीय संचालक (महाबीज), कृषी विद्यापीठातील संशोधक व विस्तार संचालक, कृषी विभागाचे सर्व संचालक, सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे रब्बी पिकांखालील क्षेत्र सुमारे ५२ लाख हेक्टर आहे. या हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, मका, कांदा व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे धरणे, बंधारे भरले आहेत. यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. रब्बीचे क्षेत्र ६० लाख हेक्टरपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी एकूण ९.१४ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून ९.२५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियेाजन करण्यात येत असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

कोकण व पूर्व विदर्भात रब्बी हंगामातील क्षेत्र कमी आहे. तेथे दुबार पिकाखालील क्षेत्र वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करणे आवश्यक असून तशा सूचना कृषिमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना यावेळी दिल्या. खरीप हंगामातील पिकांची सद्यःस्थिती, सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया गतवर्षी रब्बी हंगामात २७.६९ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. यंदा क्षेत्रवाढीचा अंदाज घेऊन ३४.६० लाख मेट्रिक टन खतांची मागणी केंद्र सरकारकडे नोंदविण्यात आली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com